जेवली राऊंड प्रादेशिक वनातून बेधडक रेती तस्करी

प्रतिनिधी:प्रवीण जोशी
ढाणकी


पैनगंगा नदी पात्राला लागूनच प्रादेशिक वन जेवली राऊंड आहे, त्यामध्ये बोडखा, पेंधा, जेवली, पिंपळगाव अशा अनेक गावालगत लागूनच प्रादेशिक वन आहे. पण काही प्रादेशिक वन कर्मचाऱ्यांना हाताखाली घेऊन त्यांच्या आशीर्वादात भर रात्रीला पैनगंगा नदीपात्रातून शासनाचे उल्लंघन करून रेतीमाफिया दररोज रेती, मुरूम तस्कर करत आहेत, परंतु शासनाचे कर्मचारी यांची मिली भगत असल्यामुळे त्यांना कोणाचीही भीती नाही असे स्पष्ट दिसत आहे. ही रेती पिंपळगाव, जेवली, गणेशवाडी, बिटरगाव, मण्याळी, मोरचंडी या गावांमध्ये खुलेआम टाकणे सुरू आहे. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर महसूल विभागाचे उत्खननास बंदी असल्यामुळे ही बेहिशोबी दरवाढ होत आहे. व गरीब शेतमजूर, रोजदार मजूर यांना मोठ्या प्रमाणात रक्कम मोजावी लागत आहे, ही दरवाढ केवळ प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचा खिसा गरम करावा लागत असल्यामुळे होत आहे का? एखाद्या गावकऱ्यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली तरीही त्यांचे कोणीही एकूण न ऐकल्यासारखे करत असल्याने बंदी भागातील जनता संतप्त आहे, बिटरगाव ते जेवली रोडवर वन्यजीव वनउपज नाका आहे, त्या नाक्यावरूनही रेती माफीया रेती मुरूम तस्कर करत असल्याने शासनाच्या कर्मचाऱ्यांची व रेतीमाफियाची प्रचंड दहशत बंदी भागात झाली असल्यामुळे यांच्या दादागिरी हैदोसामुळे ग्रामीण भागात गोरगरीब जनतेमध्ये भीतीचे वातावरण दिसत आहे, व रेती माफिया याची मान उंचावली आहे.
म्हणून प्रशासनाने जातीने लक्ष घालून मोका पाहणी करून दोषीवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी बंदी भागातील गावकरी करत आहे.