
ग्रामपंचायत लाठी भालर वसाहत येथील लोकसंख्या व मतदारांची संख्या कमी झाल्याने ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमी करण्याबात यवतमाळ जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी निवेदन देऊन भेट घेतली.मागील 2011 नंतर भारत देशात जनगणना झाली नाही 2021 ला जनगणना होणे अपेक्षित असताना जनगणना केंद्र सरकारने केली नाही त्यामुळे आज जिल्हाधिकारी यांना भेटून होणाऱ्या निवडणुकीत सदस्य संख्या कमी करूनच निवडणूक घ्यावी असे निदर्शनास आणून दिले.यापूर्वी झालेल्या निवडणुकीत निवडणूक २०१५ आणि २०२० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकसंख्या ३८८९ इतकी होती मतदार संख्या २९६० इतकी होती तर ग्रामपंचायत सदस्य संख्या ११ होती त्यामुळे निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना महत्वाची बाब राहुल खारकर यांनी निदर्शनास आणून दिली की वर्तमान स्थितीमध्ये आशा सेविका यांच्या माध्यमातून विविध सर्व्हे करण्यात आले होते ज्यात माझे कुटुंब माझी जबादारी,कुष्ठरोग,क्षयरोग असे विविध सर्व्हे मधून ग्रामपंचायत लाठी भालर वसाहत ची लोकसंख्या ही केवळ २१९२ आहे तर मतदारांची संख्या केवळ १६७७ इतकी आहे त्यामुळे निवडणूक विभागाच्या पुनर्ररचना धोरणानुसार लोकसंख्या कमी झाली असता सदस्य संख्या कमी व्हायला हवी असा सार्वत्रिक संकेतांक आहे त्यामुळे निवेदनाच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकीत सदस्य संख्या कमी करण्यात यावी तेव्हाच निवडणूक घ्यावी असे राहुल खारकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातुन कळवले.
