
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी/रामभाऊ भोयर
पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल दै.देशोन्नती चे पत्रकार दीपक पंढरीनाथ पवार यांची सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन पुणे यांच्या वतीने दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकार 2026 या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार आपल्या परिसरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवा तथा पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यां मान्यवरांना सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येते यंदा या पुरस्कारासाठी सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या वतीने दिपक पवार यांची निवड करण्यात आली आहे.अध्यक्ष डॉ. प्रशांत डी. चव्हाण, ॲड. जयश्री बी. सोनवणे सचिव, यांच्या वतीने लोक कवी सिताराम नरके राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार दिपक पवार यांना प्रदान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिताराम नरके, तर उमेश चव्हाण रुग्ण हक्क परिषद अध्यक्ष, तर कार्यक्रमाचे उद्घाटक अक्षय दिलीप सरवदे पोलीस उपनिरीक्षक पुणे, प्रमुख अतिथी प्रियंका प्रवीण बारसे पि.चि.म.न.पा. नगरसेविका, प्रमोद वाघ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिघी पोलीस स्टेशन, मनोज लक्ष्मण साळवे उद्योजक, अतुल गुंजाळ, तर या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता मॉडेल सेलिब्रिटी ज्युरी एम टेक सिव्हिल इंजिनिअर शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. सदर हा कार्यक्रम डॉक्टर प्रशांत डी चव्हाण, डॉक्टर ओंकार डी चव्हाण, एडवोकेट जयश्री बी सोनवणे, द्रोपदी बी सोनवणे, दत्तात्रय चव्हाण, लताबाई डी. चव्हाण, संगीता किशोर बोरुडे यांनी खास करून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यां नागरिकांसाठी आयोजित केला असल्याचे एडवोकेट जयश्री सोनवणे यांनी सांगितले आहे
