कर्तव्यदक्ष सभापती प्रशांत भाऊ तायडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मुधापुर ते पारडी पांदण रस्त्यासाठी 15 ऑगष्ट रोजी बसलेल्या मूधापुर येथील उपोषनकर्त्याना आश्वासन देऊन त्यांचे उपोषण सोडले

1

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मूधापुर येथे दि 15 ऑगष्ट पासून मूधापुर ते पारडी पांदण रस्ता खडीकरण करण्यात यावा यासाठी गावातील उपसरपंच बालाजी देठे,सदस्य सोनू वसंतराव आत्राम,वृंदा गणेश मेश्राम,ताईबाई उईके,हे उपोषणाला बसले होते,या उपोषणाचा पहिल्याच दिवशी राळेगाव पंचायत समितीचे सभापती प्रशांतभाऊ तायडे व इंजिनियर पिसाळकर यांनी मूधापुर येथील उपोषण मंडपाला भेट देऊन मुधापूर पारडी येथील पांदण रोडबाबत असलेली समस्या जाणून घेतली व लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावू असे आश्वासन देऊन उपोषण स्थगित करण्यात आले,ह्यावेळी सभापती प्रशांतभाऊ तायडे,इंजिनियर पिसाळकर साहेब,पोलीस कर्मचारी अशोकरावजी भेंडाले, आकाशभाऊ कुदुसे सह अनेक नागरिक उपस्थित होते.