
जिल्हा अभियान व्यवस्थापकाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती च्या भोंगाळ कारभाराबाबत तालुक्यातील अनेक गावांमधून
वारंवार वृत्त प्रकाशित होऊन सुद्धा जिल्हा अभियान व्यवस्थापक याकडे दुर्लक्ष का करत आहे ?
राळेगाव तालुक्यातील येवती येथील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत असलेल्या महिला बचत गटांच्या महिलांनी राळेगाव गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. सविस्तर वृत्त असे सदर येवती येथील अनमोल महिला ग्राम संघ या ग्राम संघातील झालेला गैरप्रकार म्हणजे कृषी सखी सुनिता गावंडे यांच्याकडून चार वर्षा अगोदर म्हणजे ऑक्टोंबर २०१९ मध्ये १०००० हजार रुपये व दुसऱ्यांदा नोव्हेंबर २०१९ मध्ये २०००० हजार रुपये अध्यक्ष सौ. अनिता कुडुमते यांच्या हस्ते प्रभाग संघाचे सी.सी.अविनाश तराडे यांना देण्यात आले होते हे पैसे देत असताना ग्राम संघाचे कॅडर कृषी सखी यांच्यासमोर देण्यात आले हे पैसे आमच्या मानधनातून देण्यात आले तसेच आय सी आर पी सौ. अरुणा जोगी यांच्या मानधनातून सुध्दा ग्राम संघाचे अध्यक्षाच्या समक्ष अविनाश तराडे यांना सण २०२२ मध्ये दहा हजार रुपये देण्यात आले आहे तसेच आयसीआरपी सुरळीत काम करत असताना सुध्दा सदर आधी असलेल्या ग्राम संघाच्या अध्यक्षा आणि प्रभाग समन्वय यांनी आम्हाला असे सांगण्यात आले की तुम्ही काम न करता तुमचे मानधन मी आपल्या अधिकाऱ्यांना म्हणजे सी.सीला टाकायला सांगते हे पैसे आम्हाला द्या असे आमच्यावर जबरदस्ती करण्यात आली त्याचप्रमाणे आमचे होणारे मानधन कृषी सखी, पशु सखी, व आय सी आर पी. यांच्या मानधनातून फिफ्टी-फिफ्टी द्या असे ग्राम संघाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून सी.सी. अविनाश तराडे यांनी आम्हाला सांगितले होते. तसेच आय सी आर पी म्हणून कृपा प्रमोद वारकर सण 2017 ते 2019 पर्यंत कार्यरत असून यांचे मानधन 2018 ते 2019 पर्यंत अभियानाने दिले नाही या विषयावर आम्ही क्षमता बांधणी अधिकारी राजु कुडफुडे यांना दोन ते तीन वेळा आमच्या सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती पण राजू कुरफुडे यांनी या विषयावर लक्ष सुद्धा दिले नाही यावरून असे लक्षात येते की यामध्ये क्षमता बांधणी अधिकारी यांचाही हात असू शकते? असे सुनिता सुनील गावंडे, अरुणा शंकर जोगी, कृपा प्रमोद वारकर, वंदना किशोर कुबडे, गीता श्रीकांत पढाल यांनी सांगितले आहे. सदर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान यांचे भोंगळ कारभार येवती गावातच नाही तर संपूर्ण तालुक्यात होत असल्याचे ओरड महिलांमधून होताना दिसत आहे तरी याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून होत असलेले लूट त्वरित थांबवावी असे या परिसरातील महिलांकडून बोलल्या जात आहे.
