
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 3 जानेवारी रोजी सवित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे व तर प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती म्हणून न्यू एज्युकेशन सोसायटी च्या सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे, सौं. लताताई खांदवे, कु. मृदुला चिव्हाणे, उपमुख्याध्यापक विजय कचरे, मनीषा इखे उपस्थित होते. यावेळी पाहुण्यानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर पाहुण्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौं. मनीषा इखे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. यावेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्यां न्यू एज्युकेशन सोसायटी च्या सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे, सौं. लताताई खांदवे, व राळेगाव तालुक्यातील पहिल्या महिला विमान चालक पायलट म्हणून कु. मृदुला चिव्हाणे, यांची निवड झाल्या बद्दल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वैशाली चौधरी यांनी केले. कार्यक्रमा चे यशस्वीते करिता शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले…
