
प्रतिनिधी-प्रवीण जोशी
यवतमाळ
मुदत संपल्यानंतर धोकादायक ठरत असलेल्या मुदतबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्याच्या महत्वाच्या कामाकडे आरोग्य केंद्र अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. मुदतबाह्य औषधे नष्ट करण्याचे नियम पायदळी तुडवत औषधे आरोग्य केंद्र आवारात उघड्यावर फेकून देण्यात येत आहेत. औषधे उघड्यावर जाळण्याचेही प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे, औषधे बिनदिक्कत जाळली जात असून औषधांची सुरक्षित विल्हेवाट लावली जात याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना सर्व प्रकारची औषधे मोफत उपलब्ध करुन दिली जातात. रुग्णांची संख्या जास्त असल्याने औषधांचा तुटवडा होऊ नये याचीही खबरदारी घेतली जाते औषधांची साठवणूक, वाहतूक, मुदतबाह्य औषधे नष्ट करणे या कामांकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. मुदत संपलेल्या औषधांची विल्हेवाट कशी लावावी, याचे नियम आरोग्य विभागाने दिले आहेत. परंतु, वैधकीय अधिकाऱ्यांनी या नियमांना थेट केराची टोपलीच दाखवली आहे. मुदत संपलेल्या औषधांच्या बाटल्या दवाखान्याच्या मागील बाजूच्या मोकळ्या आवारात फेकून दिल्या आहेत. व्हीटामिन ए च्या पॅकबंद टॅबलेटचीही तीच अवस्था झाली आहे. औषधांच्या मोकळ्या बाटल्या, ऑपेरशनसाठी वापरलेले साहित्य, सलाइनचे साहित्यही जागा दिसेल तेथे फेकून देण्यात आले आहे. सरकारी दवाखान्यात अशा पद्धतीने सरकारी नियम पायदळी तुडवले जात आहेत.
सुरक्षेकडे दुर्लक्ष
खराब औषधे, सलाईनच्या बाटल्या व इतर प्रकारची उपकरणे जाळतानाही कोणतीच काळजी घेतली जात नाही. औषधांच्या काचेच्या बाटल्या आगीत तडकल्यामुळे काचा परिसरात पसरत आहेत. औषध गोळ्या दवाखान्याच्या मागील बाजूस साठवल्यामुळे आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णा बरोबरील लहान बालकाने कळत न कळत खाली किंवा खेळतांना जर सिरिंज बुडाली तर होणाऱ्या संभाव्य आजाराची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्र स्वीकारणार का घाणीचे साम्राज् मागील बाजूस तर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिसराची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने ठिकठिकाणी सार्वजनिक मुताऱ्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कचराही येथेच आणून टाकला जात असल्याने घाणीत भरच पडली आहे. खराब औषधे कचरा येथेच जाळला जात आहे. ठिकठिकाणी गवत उगवल्यामुळे हे ठिकाण जनावरांसाठी कुरणच बनले असून आवाराची अशी विदारक स्थिती बनली आहे.नियमांकडे दुर्लक्ष मुदत संपलेली औषधे नष्ट करण्यासाठी नियम आहेत. मुदतबाह्य औषधे कुठेही उघड्यावर टाकून देता येत नाहीत किंवा ती जाळताही येत नाहीत. मुदतबाह्य टॅबलेट्स असतील तर त्या पाण्यात विरघळवून नष्ट कराव्या लागतात. सिरमबाबतही विशिष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे, मात्र ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैधकीय अधिकारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे.
