राळेगाव तालुक्यातील गावात अतीवृष्टी आणि पुर परिस्थिती मुळे अतोनात नुकसान झाले स्थानिक प्रशासनाने पंचनामे करून शासनाने त्वरित मदत द्यावी – मधुसूदन कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

नैसर्गिक आपत्ती आणि पुर परिस्थिती अश्या अस्मानी संकटात राळेगाव तालुक्यातील बहुतांश गावांना फटका बसला अनेकांच्या घरात पाणी घुसले आणि घराच्या भिंती पडल्या शेतात पाणी घुसून सर्व परिसर जलमय झाला आहे आणि आर्थिक नुकसान झाले आहे ही परिस्थिती सामान्य माणसाला वेदना देणारी आहे म्हणून स्थानिक प्रशासनाने, सरपंच सचिव, तलाठी, कोतवाल, कृषी सेवक, मुख्याध्यापक आणि आरोग्य सेवक आणि आशा सेवक यांनी पंचनामे करून तालुका अधिकारी कार्यालयात सादर केले पाहिजे

तालुका प्रशासन अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी आरोग्य अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या परिसरातील अतिवृष्टी मुळे झालेलं नुकसान सरकारच्या माहितीस्तव सादर केले पाहिजे आणि सरकार ने पुर परिस्थिती मुळे झालेल्या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना त्वरित मदत दिली पाहिजे

पुरग्रस्त भागात NGO सामाजिक संघटना चे प्रतिनिधी , पत्रकार बंधुनी आजी माजी लोकप्रतिनिधी नी पुर परिस्थिती भागात प्रत्येक्षात त्या ठिकाणी जाऊन सामाजिक जबाबदारी म्हणून भेटी दिल्या पाहिजेत असे मतं मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून व्यक्त केले आहे.