रेतीची अवैध वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर पकडले

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

 

राळेगाव तालुक्यातील आष्टा इचोरा घाटातील दोन ट्रॅक्टर दिनांक 25 12 2022 ला सायंकाळी अवैद्य रेतीची वाहतूक करताना रंगेहात दोन ट्रॅक्टर पकडले. सदर रेती घाटाचे लिलाव झाले नसले तरी रेतीची अवैध तस्करी करणाऱ्यांना रान मोकळे असल्यासारखे दिवस रात्र असताआष्टा ईचोरा घाटातून रेतीचा उपसा सुरू असताना काही गावकऱ्यांनी तशी तक्रार तलाठ्याकडे केली असता आष्टा इसोरा घाटात धाड मारण्यात आली यावेळी त्यावेळी तेथे रेतीची अवैध तस्करी करत असताना दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले सदर ट्रॅक्टर गहूकार सावरगाव, व आशिष राजेंद्र जगताप ,माटेगाव यांच्या मालकीची असून दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे, सदरची कारवाई दिलीप बदकी नायब तहसीलदार राळेगाव, मोहन सरतापे तलाठी राळेगाव, सौरभ तुमस्कर तलाठी राळेगाव यांनी करून दोन्ही रेतीचे ट्रॅक्टर कार्यालयात जप्त करण्यात आले.