साई पॉलीटेक्निक येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

साई पॉलीटेक्निक येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचे उद्घाटन आज मा. पंतप्रधान यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार असून, त्यांचा विकास अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या माजी जिल्हा अध्यक्ष तथा भाजपा तथा म. प्र.ओबीसी आघाडी उपाध्यक्ष श्री. राजेंद्रजी डांगे,भाजपा राळेगाव तालुका अध्यक्ष श्री. चित्तरंजनदादा कोल्हे, संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयजी काकडे, माजी राळेगाव प.स. सभापती श्री. प्रशांतजी तायडे, वडकी पो. स्टे. ठाणेदार श्री. सुखदेव भोरखेडे तसेच साई पॉलीटेक्निकचे प्राचार्य ठमके सर इत्यादी व परिसरातील अनेक सामाजिक कार्यकरते, युवक व युवती कार्यक्रमाला उपस्थित होते.

उद्घाटनावेळी प्राचार्य नितीनजी ठमके यांनी योजनेबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, “आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्राप्त होतील, तसेच औद्योगिक क्षेत्रातही त्यांना नवनवीन संधी मिळणार आहेत.” पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी कौशल्य विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले असून, योजनेमुळे शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्री. संजयजी काकडे व्यक्त केला आहे