वरोरा शहरात दोन दिवसात विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल,वकील महिलेचा विनयभंग,गुन्हा दाखल

कालच दिनांक 5 सप्टेंबर ला एका महिला फार्मासिस्ट चा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असताना आज दिनांक 6 सप्टेंबर ला एका वकील महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली .
डोंगरवार चौक परिसरात असणाऱ्या एका इमारतीत महिला वकील आपल्या कुटूंबियांसोबत राहतात त्याच परिसरात राहणारा आरोपी संदीप चटकोजवार हा आपल्या आई सोबत याच परिसरात राहतो.
संदीप चटकोजवार हा मागील वर्षांपासून आरोपी हा वकील महिलेला हातवारे करीत होता.तीन महिन्या अगोदर वकील महिला दुचाकीने घरी जात असताना संदीप ने अश्लील हातवारे करीत महिलेकडे एकटक बघत होता.
दिनांक 6 सप्टेंबर ला वकील महिला आपल्या पतीसोबत असताना संदीप महिलेकडे एकटक बघत हसत होता.

वारंवार दुर्लक्ष करून सुद्धा तोच प्रकार घडत असल्याने शेवटी काल दिनांक 6 सप्टेंबर ला महिलेने वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. संदीप चटकोजवार वर कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप पोलिसांचा हाती लागलेला नाही त्याचा शोध वरोरा पोलीस घेत आहे.