
वरोरा :- वरोरा तालुक्यातील चिकणी ग्रामपंचायत हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहेत कधी शिपाई या पदासाठी झालेल्या भ्रष्टाचारात तर ग्रामविकास अधिकाऱ्याच्या उर्मट हेकेखोर पणामुळे कंटाळलेली जनता असे अनेक विषय चर्चेची बनत चाललेले असून त्यात नागरिकांसाठी गावाच्या स्वच्छते करिता भारत स्वच्छता मिशनद्वारे पाठविलेले साहित्य धुळखात पडून असल्याने त्यात अजून एका समस्सेची भर पडली आहे, यावर ग्रामपंचायत पदाधिकारी, शासकीय अधिकारी हे दोषी असल्याने दिसत आहे.
संपूर्ण भारत देशात स्वच्छता भारत मिशन राबविल्या जात आहे यासाठी केंद्राकडून अनेक राज्यांना कोट्यावधींचा निधी उपलब्ध करुन देण्यात येतो जेणेकरून शहरी तसेच ग्रामीण भागातील अस्वच्छतता दूर होऊन गावखेड्यातिल परिसर सुंदर होईल या आशेने पंचायत समिती साहित्याचा पुरवठा करते. चिकणी या ग्रामपंचायतीमध्येही तीन चाकी कचरा गाडी, तीन चाकी ऑटो (ई- रिक्षा ) रिक्षा, प्लास्टिक संकलन करण्यासाठी दिलेल्या रिक्षा या धूळ खात पडलेल्या स्थितीत आहे. गावातील नागरीक मागील अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे तिथेच आता नव्याने या कचराकुंडीचा, कचरा गोळा करणाऱ्या साहित्याचा मुद्दाही जोर धरू लागला आहे, चिकणी ग्रामपंचायतला डिसेंबर 2022 ला अंदाजे चार ते पाच लाखाच्या निधीतून कचरा, प्लास्टिक, ओला कचरा व सुखा कचरा संकलन करण्यासाठी साहित्य पुरविल्या गेले हे सर्व साहित्य देण्यासाठी शासन निधी ग्रामपंचायत मधून येणाऱ्या करवसुलीच्या माध्यमातून मिळविलेल्या निधीतून केल्या जातो.
ग्रामपंचायत चिकणीच्या अधिकारी व काही पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे या सर्व साहित्यांचा नागरिकांना लाभ मिळत नाही. शेवटी या ग्रामपंचायतीमध्ये चालले तरी काय असा प्रश्न आता नागरिकांना पडला असून जनतेच्या सेवेसाठी, स्वच्छतेसाठी आलेल्या निधीतून मिळणाऱ्या साहित्यांचा दुरउपयोग ग्रामपंचायतच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने होऊन राहिलेला आहे. या सर्व साहित्याचा सदुपयोग करायचाच नव्हता तर हे सर्व साहित्य पंचायत समिती द्वारे का घेण्यात आले? या सर्व प्रकरणावर वरिष्ठ अधिकारी सखोल चौकशी करतील काय? अशी चर्चा आता नागरिकांत होऊ लागलेली आहे.
