मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या चंद्रपूर दौऱ्यानिमित्य स्वागताला अलोट गर्दी करा:मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांचे जनतेला आवाहन.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला चंद्रपूर दौरा हा येत्या १९ व २० सप्टेंबरला होणार असून जिल्ह्यातील तमाम मनसे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक व मराठी जनतेने या दौऱ्यात अलोट गर्दी करून हा दौरा ऐतेहसिक करावा असे आवाहन चंद्रपूर जिल्हा मनसे अध्यक्ष दिलीप रामेडवार व इतर मनसे पदाधिकारी यांनी केले आहे.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे नागपूर वरून ते १९ सप्टेंबरला दुपारी २.०० वाजता चंद्रपूर करिता निघणार आहे व त्यांचे वरोरा येथील रत्नमाला चौक, भद्रावती येथे स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे चौकात व पडोली येथील चौकात जंगी स्वागत होणार आहे. त्यानंतर त्यांचे जिल्हा विश्रामगृह येते आगमन होईल व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा होणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २० सप्टेंबरला सकाळी ९.०० वाजता चंद्रपूर शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत बैठक होईल व त्यानंतर सकाळी १०.०० वाजता ग्रामीण मनसे पदाधिकाऱ्यांची विधानसभा निहाय बैठक होईल. जिल्ह्यातील व चंद्रपूर शहारातील काही व्यापारी,औधोगिक, सामाजिक व शैक्षणिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी होतील. त्यानंतर पत्रकारासोबत हितगुज होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांचे दुपारी २.०० च्या दरम्यान अमरावती कडे व्हाया वरोरा वणी मार्गे प्रस्थान होईल.