
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आजच्या आधुनिक युगात देशाच्या ग्रामीण भागात मोबाईल व इंटरनेटमुळे मोठी क्रांती होऊन जग जवळ आले. परंतु याच मोबाईलवर इंटरनेटच्या क्रांतीत कमी जास्त पैशात दिवसाला एक जीबी दीड जीबी दोन जीबी या प्रमाणात नेट पॅक देण्याची प्रथा विविध कंपन्यांनी लावली. त्यात दिवसाला दीड जीबी हा नेट पॅक ग्रामीण भागात खेडोपाडी सर्वात जास्त लोकप्रिय ठरत आहे. व या नेट पॅक च्या मागे ग्रामीण भागातील अख्खी तरुण पिढी बिझी झाली आहे.
ग्रामीण भागात इंटरनेटच्या सकारात्मक वापराबद्दल अज्ञान असणाऱ्या तरुण पिढीच भविष्य उद्ध्वस्त करायला ही दिवसाला नेट पॅक मध्ये मिळणारी दीड जीबी कारणीभूत ठरणार आहे. कारण ग्रामीण भागातील आजची तरुणाई काम धंदा काय करायचा हा विचार करण्यापेक्षा दीड जीबी कशी संपवायची यातच गुंतून पडली आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढी भविष्याचा कसलाच विचार करत नाही कारण त्यांना ह्या दीड जीबी मुळे कसलाच विचार करायचा वेळ मिळत नाही. त्यांना दीड जीबी कशी संपेल याचाच विचार असतो भविष्याचा नसतो.
आजच्या पिढीच्या तरुणांच्या हातात कधीच पुस्तक दिसत नाही. त्यामुळे वाचन शून्य तर लेखन खूप दूरची गोष्ट. कारण हातात पुस्तक नाही वाचन शून्य तर लेखन कुठून येणार? परंतु येणारा काळ हा ह्या तरुण पिढीसाठी भयंकर असा असणार कारण शिक्षण नसल्यामुळे नोकरी मिळणार नाही व हातात कोणतेच कौशल्य नसल्यामुळे धंदा पण करता येणार नाही. वाचन लेखन व शिक्षण नसल्यामुळे बेरोजगारी वाढणार. बेरोजगारी वाढल्याने व तरुण पिढीत वाचन लेखनाचा अभाव असल्याने त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होणार कमीपणाची भावना तरुण पिढीवर निर्माण होऊन ह्या नेट पॅक च्या दीड जीबी मुळे पुढील काही वर्षात फार भयावह परिस्थिती निर्माण होणार. हीच दीड जीबी तरुण पिढीच्या जीवावर उठून तरुण पिढीचा केव्हा आयुष्य उध्वस्त करेल हे सांगता येणार नाही.
त्यामुळे नेटचा वापर आपण जेवणाबरोबर जशी लोणचे लावून खातो तसा व्हायला पाहिजे. नाहीतर आजच्या तरुण पिढीला मानसिक रुग्ण व्हायला वेळ लागणार नाही. आजच्या तरुण पिढीने नेटच्या मागे न पळता आपल्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण आजच्या युगात स्पर्धा खूप मोठी आहे. वेळ अजून गेलेली नाही नाहीतर दीड जीबी अख्खी तरुणाई बिझी म्हणण्याची वेळ येणार.
