
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ येथे राहणारा मृतक सुमीत पांडूरंग नंदुरकर (३२) या युवका सोबत १४ फेब्रुवारी रात्री ■ १०.३० वाजता गावातीलच आरोपी राहुल शंकर नान्हे (३०) याचे भांडण झाले आणि त्याने – सुमीत नंदुरकर याच्या पोटावर, छातीवर व शरीराच्या विविध ठिकाणी सुरीने प्राणघातक हल्ला करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला झाल्यानंतर आरोपी राहुल हा पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या सुमीतला लगेच राळेगाव येथे उपचारा करिता आणले. परंतु त्याची अधिक गंभीर असल्याने त्याला लगेच यवतमाळ येथे स्थानांतरीत करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. दरम्यान मृतकाचा पिता पांडूरंग नानाजी नंदुरकर (६५) रा. रामतीर्थ याने राळेगाव पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीवरुन प्रथम ३०७ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु त्याच्या मुलाचा रुग्णालयात मृत्यु झाल्याने त्याचे विरोधात भादंवि ३०२ अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही तक्रार प्राप्त होताच राळेगावचे ठाणेदार यांनी त्वरीत पथक पाठवून रामतीर्थ येथील शेतातून खून करणाऱ्या राहुल नान्हे याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण जाधव, पो.उप.नि. निलेश गायकवाड, जमा. रत्नपाल मोहाडे, पो.कॉ. सुरेश चिव्हाणे, प्रशिक जीवने यांनी केली.
