
स्थळ:- तळेगाव (भारी) पांढरकवडा रोड यवतमाळ
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीन उन्नतीसाठी व समाज कल्यानार्थ तळेगाव भारी पांढरकवडा रोड यवतमाळ येथे निर्माण करण्यात आलेल्या कांतीविर बाबुराव शेडमाके आदिवासी समाज प्रबोधनी संस्कार केंद्राचा लोकार्पण सोहळा व राष्ट्रपिता महात्मा गांधीवक्रांतीविर] बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३0 वाजता देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली क्रिडा व पशुसंवर्धन मंत्री ना.सुनील केदारा यांच्या शुभहस्ते तर खा. बाळासाहेब धानोरकर, ज्येष्ठ पत्रकार व लेखक मधुकर भावे यांच्या विशेष उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. वाजाहात मिर्झा, माजी मंत्री ऍड पद्माकर वळवी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, माजी आदिवासी विकास राज्यमंत्री मारोतराव कोवासे, माजी आ.वामनराव कासावार, माजी आ. आनंदराव गेडाम, माजी आ. संतोषराव टारपे, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, माजी आमदार पेटाराम तलांडी, माजी आमदार रामकृष्ण मडावी, माजी आमदार विजयराव खडसे , माजी आमदार कितीबाबू गांधी, माजी आमदार दीपक आत्राम, माजी आमदार केवलराम काळे, माजी अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ मानकर, माजी अध्यक्ष प्रवीण भाऊ देशमुख, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे तेव्हा या कार्यक्रमाला आदिवासी बांधवांना प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी पत्रकार परिषदेतून केले याप्रसंगी बाळकृष्ण गेडाम प्राचार्य माधवराव सरकुंडे रमेश भिवांकर वनीष भोसले उत्तमराव गेडाम दिपक कर चाल व समस्त क्रांती विर बापूराव शेडमाके आदिवासी प्रबोधिनी आयोजन समिती आदी समितीच्या सदस्य उपस्थित होते
