
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आज दिनांक 8/0 9 /2022 रोजी राळेगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस स्टॉप रात्रीच्या गस्तीवर असताना अवैध वाहतूक करणाऱ्या जनावराच्या संबंधाने वर्धा बायपास रोडवर पेट्रोलिंग करीत असताना रात्री 3. 30 मिनिटांनी दरम्यान वर्धा बायपास चौफुलीवर एक बुलेरो पिकअप वाहणा मधून जनावरे असल्याचा वास आल्याने त्यांचा पोलिसांनी पाठलाग करून थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तो समोर निघून गेला व वाहन चालकांनी त्याचे वाहन चालक भरधाव वेगाने चालवून वाहन चालकांनी त्रिमूर्ती मंगल कार्यालय राळेगाव येथे थांबवून वाहन चालक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता मिळून आला नाही, परंतु बुलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच 29 ए टी 0344 वाहनावर झाकून असलेल्या ताडपत्री काढून पाहणी केली असता त्यामध्ये आठ नग गोवंश जातीचे जनावरे तोंडाला व पायाला आकुड दोराने बांधून कूरपणे कोंडून त्यांना चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था गाडीमध्ये न करता कत्तल करणे करिता वाहतूक करून घेऊन जाण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने एकूण आठ नग गोवंश जातीचे जनावरे एकूण किंमत रुपये 78 हजार जनावरे वाहतुकी करिता वापरलेले बुलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच 29 ए टी 03 44 किंमत पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल राळेगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने आज रोजी सकाळी जप्त करून फरार आरोपी यांच्यावर ॲनिमल ॲक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय चौबे ठाणेदार राळेगाव, पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, पोलीस अमलदार गोपाल वास्टर,अनंता ईरपाते, अमित मैदकर, सुरज चिव्हाने ,प्रकाश मुंडे,होमगार्ड गजानन मुंडे, गणेश महाजन व मनोज कुमरे यांनी केली,असून शहरात त्यांच्या कार्याची स्तृती करण्यात येत आहे.
