
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
विदर्भ पटवारी संघ नागपुर उपविभाग शाखा राळेगाव व मंडळ अधिकारी संघ नागपुर जिल्हा शाखा यवतमाळचे धरणे आंदोलन
आज दिनांक १/३/२०२३ रोजी विदर्भ पटवारी संघ नागपुर उपविभाग शाखा राळेगाव व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपुर जिल्हा शाखा यवतमाळ यांनी महागाव येथिल मंडळ अधिकारी श्री पि. आर.कांबळे तलाठी आर.जी. चव्हाण व डी.बि. चव्हाण यांच्या विरुद्ध गौण खनिज प्रकरणात दिनांक ९/२/२०२३ रोजी निलंबनाची कार्यवाही रद्द करण्याबाबत मागणी करून आज एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रकरणामध्ये तहसीलदार महागाव नायब तहसीलदार महागाव व उपविभाग अधिकारी उमरखेड यांची भुमिका संशयास्पद आहे. शासनाचे वतीने रेती धोरण सुव्यवस्थीत पणे राबविण्यात येत नाही. त्यामुळे जनतेला रेती मिळणे कठीण झाले. या परिस्थितीचा दुरुपयोग करुन रेती चोर व रेती माफीया रेतीवर डल्ला मारतात. तलाठी, मंडळ अधिकारी यांना रेती प्रकरणी कारवाई करण्याचे थेट अधिकार नसताना अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतर प्रकरण न्यायालयात टिकत नाही. कोर्टात चोर व माफिया हे सुटतात असे हे विचीत्र रँकेट सुरु आहे. या मध्ये सामान्य जनता भरडली जात आहे. रूट लेव्हलवर संघर्ष निर्माण होत आहे. याला शासनाचे रेती धोरण जबाबदार आहे. करीता वरील मंडळ अधिकारी व तलाठी यांचे वरील कार्यवाही मागे घेण्याकरीता एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलन स्थळी मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सानप साहेब व तलाठी संघाचे अध्यक्ष पाटील साहेब व सर्व मंडळ अधिकारी व सर्व तलाठी हजर होते
