
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
नवोदित आदिवासी साहित्य परिषद, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली होती या परीषद मध्ये सहभागी अध्यक्ष मा डॉ तुकाराम रोंगटे, मराठी विभाग प्रमुख पुणे विद्यापीठ पुणे हे होते तर प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक मा डॉ प्रा . संजय लोहकरे आणि मा डॉ चिंतामण धिंदळे पणवेल जेष्ठ साहित्यिक मा बाबाराव मडावी ( आंकातकार ) यवतमाळ मा प्रा संगीता मसराम मा डॉ विलास कनाके मा राजु मडावी साहेब गट शिक्षणाधिकारी बाभुळगाव हे होते.या परीषद चे स्वागताध्यक्ष मा प्रा वसंत कनाके साहेब ( हुंकार आदिवासीचा ) आयोजक म्हणून महत्वाची भूमिका बजावली आदिवासी समाजात वैचारिक मंथन व्हावे यासाठी, प्रबोधन आणि मार्गदर्शन आदिवासी ची संस्कृती आणि साहित्यिक म्हणून मार्गदर्शन झाले पाहिजे या संदर्भात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र आणि पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे.मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत एक प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून त्यांना ” समाज रत्न पुरस्कार ” देवुन सन्मान केला आणि त्यांच्या मध्ये असलेली सामाजिक वैचारिकता त्यांनी लिहिलीले पुस्तक “आयुष्याच्या पलिकडे असलेलं आयुष्य ” “कर्मयोग ” यांचे प्रकाशन नवोदित आदिवासी साहित्य परिषद चे अध्यक्ष आणि प्रमुख मान्यवर च्या हस्ते करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन मा प्रा नितीन टेकाम पांढरकवडा यांनी केले होते अतिशय दूरदर्शी अविस्मरणीय मार्गदर्शन आणि सन्मान आणि ” कर्मयोग ” पुस्तकाचे प्रकाशन आणि आदिवासी समाजात समाज मान्य म्हणून ” समाज रत्न पुरस्कार ” देण्यासाठी योग्य व्यक्ती निवड केली हे नवोदित आदिवासी साहित्य परिषद चे वैशिष्ट्य ठरले , या परीषद मध्ये शेवटी कवी संमेलन घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
