
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारेगांव येथील नंदुरकर यांच्या ट्रॅक्टर वर असलेल्या ड्रायव्हरने भरधाव वेगात ट्रॅक्टर निष्काळजीपणाने चालवून गावाल एका पंधरा वर्षे तरुणाचा ट्रॉली खाली दाबून मृत्यू पावल्याची घटना
दिनांक २० मार्च रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली आहे.
कारेगाव येथील अंश श्रीराम कोडापे वय १५ असे मृतक युवकाचे नाव असून याप्रकरणी वडकी पोलीस ठाण्यात आरोपी ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अंश कोडापे हा गावातील नंदुरकर यांच्या ट्रॅक्टर वर बसून मित्र सोबत जात असताना यातील ट्रॅक्टर चालकांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर भरताव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने अचानक रस्त्याच्या वळणावरती ट्रॅक्टर पलटी झाला या अपघातात ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली दबून अंश कोडापे या मुलाचा जागीच मृत्यू झाला ट्रॅक्टर खाली मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला होता गावातील नागरिकांनी तातडीने ट्रॅक्टर बाजूला करून मृतदेह बाहेर काढला व विच्छेदनाकरिता राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला याप्रकरणी मृतकाची आई सौ सीमा श्रीराम कोडापे यांच्या तक्रारीवरून वडकी पोलिसांनी आरोपी ट्रॅक्टर चालक समीर राजू नंदुरकर वय २२ वर्ष राहणार कारेगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे करीत आहे
