
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
पांडुरंग रुक्मिणी देवस्थानच्या वतीने मंदिराच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात श्रीमद भागवत कथा सप्ताह नुकताच संपन्न झाला 17 ते 23 ऑगस्ट दरम्यान हा सप्ताह संपन्न झाला संभाजी नगर येथील ह भ प संदीप महाराज सांगळे यांनी सात दिवस भागवत केले त्यांना धोंडूबा महाराज गरुड ,लखन महाराज आळंदीकर ,आकाश महाराज लोखंडे, गोपाल महाराज मोरे ,गणेश महाराज दरोडे,सागर महाराज नांदूरकर ,शरद महाराज रेनगुळे, सागर महाराज ठोंबरे यांची साथ लाभली याशिवाय सात दिवस दररोज काकड आरती ,तर सायंकाळी हरिपाठ व भारुड हे कार्यक्रम होत होते 24 ऑगस्टला गोपाल काल्याचे कीर्तन झाले व महाप्रसादाने भागवताची सांगता झाली यावेळी मंदिराचे विश्वस्त रमेश सोनी यांनी मंदिरास पांडुरंग रुक्मिणी यांच्या मूर्तीवर शत्र भेट दिले मंदिरात संपन्न झालेल्या सर्व कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती भागवत सप्ताहासाठी देवस्थानचे अध्यक्ष ऍड प्रफुल्ल चौहान, उपाध्यक्ष पारस वर्मा ,सोनाली काळे,सचिव राजेश काळे,सहसचिव रमेश सोनी,कोषाध्यक्ष संजय इंगळे,,सदस्य प्रकाश मेहता,भुपेंद्र कारिया,जानराव गिरी,प्रदीप ठुने,पद्माकर ठाकरे,सुनंदा केंढे,उषा काळे यांनी सहकार्य केले.
