ढाणकी सह ग्रामीण भागातील विकास कामे त्वरित करा डॉ.विजय कवडे

. ढाणकी प्रतिनिधी::प्रवीण जोशी


उमरखेड तालुक्यातील ढाणकी ग्रामीण भाग व बंदी भागात कोणतेही विकास कामे झाली नसल्यामुळे अनेक समस्या आहेत. अद्याप ढाणकी च्या व ग्रामीण भागा सह बंदिभगितील अनेक स्मस्या आहेत.या सर्व समस्या असून देखील कोणताच लोकप्रतिनिधी असा छातीठोकपणे सांगु शकत नाही की मी ढाणकी शहरासह ग्रामीण भागाच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून विकास करून दाखविला. मात्र या सर्व समस्या चे निवारण करण्यासाठी डॉ विजय कवडे माजी जिल्हा परिषद पुढे आले.व त्यांनी ढाणकी, ग्रामीण व बंदी भागातील अध्याप शासनाच्या मुलभुत सुविधा मिळत नसल्याने अनेक नागरीक त्रस्त आहे.
ढाणकी नगरपंचायत असून ढाणकी शहराला २० दिवसाआड नळाला पाणी येत असल्यामुळे तेथील पाणी प्रश्न सोडविणे ,
ढाणकी येथे टेंमेश्वर नगर असून तेथील नागरीकांना अध्याप नमुणा आठ मिळत नाही,
ढाणकी शहरामध्ये ४० ते ४५ हजार लोकसंख्या असून शहरामध्ये कोणताही रस्ता चांगला नाही. सर्व रस्त्यात चिखलाचे साम्राज्य असून सर्व रस्ते , तात्काळ दुरुस्त करण्यात यावे ,बंदी भागातील नागरीकांचे वर्ग २ ची जमीन वर्ग करण्यात यावी, व बंदी भागातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. शहराची लोकसंख्या ४० ते ४५ हजार असून शहराला५० ते६० खेडे जोडले आहेत. कोणत्याही शालेय व शासकीय कामासाठी विद्यार्थी व शेतकऱ्यांना तहसीलच्या कामासाठी उमरखेडला जावे लागते.त्यात शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या कामाची बुडवणुक होत असते. त्यामुळे ढाणकी शहराला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा ,ढाणकी येथील मंजुर झालेले घरकुल त्वरीत देऊन त्यांना घरकुलांबा लाभ देण्यात यावा , नदी काठील शेतकऱ्यांना शासनामार्फत पाईपलाईन देण्यात यावी, गोरगरीब वंचितांना तात्काळ धान्य देण्यात यावे.
या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा दिनांक १० ऑगस्ट २०२४ पासून ढाणकी येथे अमरण उपोषणास बसण्यात येईल. माझ्या जिवीत्वास काही झाल्यास सर्वस्वी जबाबदार संबंधीत प्रशासन राहिल. असा थेट इशारा डॉ कवडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदना मार्फत दिला.