
वरोरा तालुक्यातील शेगाव येथून आनंदवन चौक येथे दुचाकी ने येत असताना आय टी आय जवळ दुचाकी ने येत दहा हजार रुपयांची मागणी केली .तरुणाच्या खिशातील पैसे आणि सोबत असणाऱ्या तरुणांची हातातील मोबाईल फोन हिसकावत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.पीडित तरुण व तरुणीने दिलेल्या तक्रारीवर जलद गतीने कारवाई करत वरोरा पोलिसांनी अक्षय मोहन सहारे 35 वर्ष , कॉलरी वॉर्ड , व आकाश उर्फ गोलू पाझारे 32 वर्ष कर्मवीर वॉर्ड यांना अटक केली. त्याच्याकडे चोरीतील मोबाईल ,गाडी असा एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर काारवाई मा .नयोमी साटम सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रभारी पोलिस अधिकारी पोलिस स्टेशन वरोरा च्या डी बी पथक ,सायबर सेल चंद्रपूर या सहाय्याने ही कारवाई पार पडली.
