
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंपरी दुर्ग येथील प्रतिष्ठित नागरिक तथा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा राळेगाव येथील जबाबदार लेखापाल सर्वांशी मिळून मिसळून वागणारे सतत बॅंकेच्या हितासाठी, शेतकरी शेतमजूराची कामे अतिशय प्रेमळपणे बोलून करणारे एक आगळावेगळं व्यक्तिमत्त्व म्हणून संजय इंगोले यांचा वाढदिवस खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात केक कापून व शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला त्यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले रावेरी ग्राम पंचायतचे विद्यमान सरपंच तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, रावेरी येथील उपसरपंच गजानन झोटींग खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर, रावेरी येथील प्रतिष्ठित नागरिक प्रविण देशमुख खरेदी विक्री संघाचे कर्मचारी गणेश हिवरकर अवधूत शेराम रोशन शिवरकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम अतिशय आनंदाने खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
