
सहसंपादक :- रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यात राज्य परिवहन मंडळाचे नऊ आगार असून या नऊ आगारापैकी राळेगाव आगार हे उत्पन्नाच्या बाबतीत टॉप अप वर तसेच आगाराच्या उत्कृष्ट कामगिरी बदल मुंबई येथे १४ जून २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आगारातील अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त राज्य सरकारने ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांकरिता तसेच ६५ ते ७५ वरील वर्षाच्या दरम्यान असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना सवलत देण्यात आली तसेच महिलांनाही ५०% सवलत देण्यात आली असून या तीनही योजनेच्या माध्यमातून आगाराच्या नियोजनबद्ध उत्कृष्ट कामगिरीतून राळेगाव आगाराला करोडो रुपयांचे उत्पन्न झाले आहे.परंतु आगारात बस संख्या कमी तसेच चालक वाचकांची आदी ५९ पदाची गरज असतांना आगारप्रमुखांच्या कामांबाबत राळेगाव हा जिल्ह्यातून नऊ आगारापैकी राळेगाव आगार उत्पनाच्या बाबतीत अग्रेसर असून प्रथम क्रमांकावर असून येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्या बद्दल मुख्यमंत्री यांच्या हस्ते आगारप्रमुख शशिकांत बोकडे यांचा सत्कार करण्यात आला आहे.
