
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार तसेच ऐकपेन ऐक वही देऊन अभिवादन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका ,संघटीत व्हा,आणि संघर्ष करा असा संदेश दिला आहे. त्याच संदेशाच्या अनुशंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐकपेन, ऐक वही हा उपक्रम राबवित गोरगरिब, गरुजु विध्यार्थांना ऐकपेन, ऐक वहीचे या उपक्रमाची सुरावत भीम टायगर सेना महिला तालुका अध्यक्ष दिक्षाताई नगराळे भगत यांनी केली.अभिवादन पर वही पेन देताना रमेशभाऊ कन्नाके, जानराव गिरी न.प.उपनराध्यक्ष राळेगाव, आदर्श महिला बँक कर्मचारी,दीपक आटे , विलासराव मुके प्रतिक जी बोबडे उज्वल नगराळे, प्रमोद सोनुले,सम्यक आटे, प्रमोद भगत आणि सर्व भीम अनुयायी उपस्थित होते.
