
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सोनामाता हायस्कूल चहांद येथे 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित स्वयंशासन या उपक्रमात सहभाग घेऊन शिक्षकांची भूमिका साकारली. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून चिराग उमाटे, उपमुख्याध्यापक, सागर मेश्राम, तर शिक्षिका म्हणून अनुष्का मेश्राम, ऐश्वर्या वारकर, पायल धोबे, श्रावणी उगे, पूर्वी देऊळकर, अक्षरा महाजन, युगा बावणे यांनी काम पाहिले.शिपाई म्हणून मानव क्षीरसागर, आदित्य सात घरे यांनी कामकाज सांभाळले. स्वयंशासनाचा शेवट समारोपीय कार्यक्रम घेऊन करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल धोबे सर, चिव्हाणे सर, दांडेकर सर, कांबळे सर, ठाकरे मॅडम, पाटील मॅडम, श्री राजेंद्रजी झोटिंग, देवानंद सोनवणे, प्रथमेश राऊत, हे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व सहभागी शिक्षक यांचे स्वागत घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.शिक्षकांची भूमिका वठवलेल्या विद्यार्थ्यांना शाळेकडून भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन श्री सावंत सर तर आभार गावंडे मॅडम यांनी मानले. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. अशाप्रकारे 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला.
