
राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225).
राळेगाव येथील कलावंत न्याय हक्क समितीचे गठन दिनांक १९ मे २०२१ रोज बुधवारला करण्यात आले असून राळेगांव तालुका कलावंत न्याय हक्क समितीच्या अध्यक्षपदी प्रकाशबाबू कळमकर यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच राळेगांव कलावंत न्याय हक्क समितीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून लोणी येथील प्रवीण गुरुदास थुल तर उपाध्यक्ष म्हणून रमेश अमृतराव पाटील, वालधूर,बंडू पैकुजी पेंदोर,खैरगाव (का), चंद्रसेन बकसुजी वाघमारे अंतरगाव, लक्ष्मण कवडूजी वटे उंदरी, मुख्य सचिव म्हणून प्रभाकर भगत राळेगाव, महासचिव म्हणून अशोकराव दमडूजी भगत कळमनेर, तर सहसचिव म्हणून राजू सोमाजी वाघमारे वालधूर, उत्तमराव भगवान मडावी अंतरगाव, चंद्रमणी बुधाजी पुनवटकर उंदरी, बंडू महादेव परचाके वालधूर, सहसंघटक म्हणून मनोहर देवाजी सावध अशोक लक्ष्मण सलाम चिकना आदींची तालुका कलावंत न्याय हक्क समितीच्या पदी निवड करण्यात आली असून राळेगाव न्याय हक्क कलावंत समिती चे महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सोमनाथ दादा गायकवाड विदर्भ विभाग प्रमुख सन्मानीय अँड शाम खंडारे मार्गदर्शक सन्माननीय आनंद भगत जिल्हा संपर्कप्रमुख कवी व गायक प्राध्यापक जनार्दन गजभिये कवी गायक माननीय प्रताप दादा लोणारे या सर्व सन्माननीय वरिष्ठ अधिकारी व कलावंतांनी राळेगाव न्याय हक्क कलावंत समितीच्या कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले
