थकीत वेतनाच्या निषेधार्थ प्राथमिक शिक्षक समितीचे काळ्या फीती लावून आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच देण्याचे घोषित केल्यानंतरही राज्यातील 25 जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे पगार अद्यापही न झाल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शासनाला प्रत्येक तालुक्यातून एक रुपयाची मानिऑर्डर पाठवून व आज राज्यभर काळ्याफिती लावून कामकाज करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे व गजानन देऊळकर यांनी दिली आहे

सातव्या वेतन आयोगाचे तीनही हप्त्याची रक्कम इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाली परंतु शिक्षकांच्या खात्यात अद्यापही जमा झाली नाही तसेच सेवानिवृत्त शिक्षकांच्या उपदानाची रक्कमही अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे व सरचिटणीस विजय कोंबे यांनी घेतलेल्या निर्णयायनुसार आज संपूर्ण राज्यभर शिक्षकांनी काळ्याफिती लावून काम केले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष- ज्ञानेश्वर नाकाडे, सरचिटणीस -गजानन देऊळकर, कार्यालयीन चिटणीस किशोर सरोदे, देवा वैद्य यांचा आवाहनाला प्रतिसाद देत,
राळेगाव तालुका अध्यक्ष महेश सोनेकर,तालुका सरचिटणीस हेमंत सिडाम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यातआले , यामध्ये गजानन यादव, पुंडलीक देवतळे, संजय एकोणकर ,विजय दुर्गे, गोविंद धोटे, संदीप क्षीरसागर, सागर धनालकोटवार, भुमन्ना कसरेवार, विनोद क्षिरसागर, मनोज मानकर, अमोल पोहनकर, सुभाष पारधी, अशोक खेकडे, भास्कर बाराहाते, संदीप टूले, प्रवीण थुल, योगेश गलाट, हनुमान जुमनाके, किरण देशमुख, सुनील यादव, किसन चौधरी, गुणवंत इंगोले,दिपक जोल्हे, प्रवीण दिडपाये, विशाल किनाके, बाबा घोडे, कुणाल सरोदे, राजेंद्र खुडसंगे, सुमित राठोड, हरिहर बोके, सीताराम वाघधरे, भगवान ठावरी, संजय चौधरी, अनिल कुंभलकर, विकास झाडे, सागर इझांळकर, समीर दौलतकर, स्वप्नील कुदुसे, कवडुजी तुमराम, दिनेश नागभीडकर,विनायक सातकर, तुकाराम हाते, अनिल वरूडकर, रवींद्र चालखूरे, मिलिंद अंबलकर, सुनील इंगोले, विनायक एकोणकर, विनोद हेडावू, दिपक मलमे, राष्ट्रपाल सुखदेवे, अविनाश ठाकरे, शाम ढुमने, विजय ठाकरे, गजानन वरघडे, सुरेश तोडासे, चिंतामण मलांडे, विलास डोंगरे, कुसुमाकर झिल्पे, गणेश देवतळे, प्रदीप शेळके, उमेश ठाकरे, प्रदीप कामडी, अनिल भगत, नागोराव आत्राम, हिंमत काळे, राहुल बोरडे, नरेंद्र नागभीडकर, सतीश आत्राम, वसंत जुमनाके, दिलीप येनोरकर, सुनील मेश्राम, चिंतामण किन्नाके, परमानंद बन्सोड, विनोद उगेमुगे, उध्वव चौधरी, संजय खडसे, राजकुमार शिंदे, सुनील डोंगरे, सचिन कुंभारे, गणेश झाडे, लाकडे सर, विनोद कुईके, रवि इंगोले, संदीप इखार,राहुल ईश्वरकर,सचिन कांबळे, राकेश फुटाणे, राहुल बकाले, हरिभाऊ मांडवकर,प्रवीण गायकवाड, विजय गेडाम,ज्ञानेश्वर कोराम,दत्ता मोहद
तालुका महिला आघाडी प्रमुख प्रिती वासेकर,सविता उइके,रीना चौधरी,माधुरी नगराळे ,माया राऊत तेजस्वी भगत ,जयश्री खडसे ,अनघा आमदे, तेजस्वीनी टिकस, मनीषा ताम्हाण ,पुष्पा गेडाम,प्रज्ञा पाटील ,रुपाली कडू,ज्योत्स्ना गायकवाड,रुपाली चांदेकर , कल्पना लाभे, मृणालिनी महाजन ,हर्षदा पांडे,स्मिता गोल्हर, सुरेखा जावळेकर,जया रोहनकर, कुमुद डाखोरे, सविता मालखेडे, अम्रुता वाघमारे, इंद्रायणी होरे, वसुंधरा माकोडे, वनिता पाचघरे, विद्या जमूनकर, जावरकर मॅडम, दर्शना ताकसांडे, अर्चना डोळस, सुलोचना मेश्राम, रत्नमाला धुर्वे,सुवर्णमाला जोल्हे, निमजे मॅडम, रुपाली बोंदाडे, हुलके मॅडम,अनिता राऊत, स्मिता काळे, किरण जगताप, रंजना खंतडे, नीलिमा जुनुनकर, प्रेमलता बोंदाडे, प्रियंका पोकळे,ईश्वरी लोहि,रीना अक्कलवार,लेशा बारई यांनी परिश्रम घेतले व आंदोलन यशस्वी केले.