चहांद येथील पात्र शेतकरी अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित,शेतकऱ्यांचे तहसीलदार राळेगाव यांना निवेदन

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यांत जुलै २०२३ मध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी झाली होती तालुक्यातील अनेक गावांत नाल्यांला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले होते तेव्हा मौजा चहांद येथील व लाडकी, कारेगाव शिवारातील नाल्यालगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर त्या नुकसानभरपाई साठी मौजा चहांद येथील तलाठी यांनी यादी केली व शासकीय मदतीसाठी प्रशासनाकडे पाठवली पण त्या यादी एकही नुकसानग्रस्त शेतकरी नाही आहे खरंतर तलाठी यांनी पात्र नुकसानग्रस्त असलेल्या शेतकऱ्याचे नावे बुद्धी पुरस्कार अतिवृष्टीच्या यादीमध्ये समाविष्ट केले नाही तेव्हा मौजा चहांद येथील तलाठी यांनी तयार केलेली यादी रद्द करुन प्रत्यक्ष चौकशी करून आम्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव अतिवृष्टीच्या यादीमध्ये समाविष्ट करून आम्हाला अतिवृष्टीचा लाभ देण्याकरिता संबंधित तलाठी यांना आदेशीत करावे अन्यथा आमची मागणी पूर्ण झाल्यास आम्ही सर्व शेतकरी दि १५ फेब्रुवारी २०२४ पासून ग्रामपंचायत कार्यालय चहांद येथे आमरण उपोषणाला बसु असा इशारा निवेदनात देण्यात आला तहसीलदार राळेगाव यांना निवेदन देतेवेळी, सर्व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते