आणि राजाभाऊंनी जोपासली सामाजिक बांधिलकी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागील, मुख्य सिमेंट रस्त्यावर मोठा उतार तयार झाला होता, त्यावरुन जाणारी येणारी वाहने व बाईक जोरात आपटत होत्या, शासकीय कंत्राटदार राजाभाऊ दुधपोळे यांनी काल रात्री आपल्या एका कंत्राटदार बंधू कडून डांबर मिक्स गीट्टीचा पक्का मसाला यावर टाकून सिमेंट रस्त्याचा व्यवस्थित उतार मिळवून दिला आहे.
हे काम करा या विषयावर नगर पंचायत राळेगांव ला सुचित केले होते पण मात्र कामं तीन महिने उलटून ही झालं नाही.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंदा धोटे, माजी नगरसेवक बंडू लोहकरे, ग्राविका संचालक गजानन पाल यांनी हा विषय शासकीय कंत्राटदार राजाभाऊ दुधपोळे यांच्या कानावर टाकला,आणि हे महत्त्वाचे कामं मार्गी लागलं आहे.
आपण ज्या शहरात वास्तव्य करतो, त्याचं काही देणं लागतोय याच उदात्त हेतूने, सामाजिक बांधिलकी जोपासत राजाभाऊंनी हे कामं केलंय हे विशेष…