
सहसंपादक : रामभाऊ भोयर
सुगंधा बहुउद्देशीय संस्था झाडगाव द्वारा आयोजित सुगंधा स्मृती पुरस्कर व्याख्यानमालेचे आयोजन दिं.३ जानेवारी २०२६ रोज शनिवारी दुपारी ३ :०० ते ५:०० या वेळात प्रथम हॉस्पिटँलिटी ऑटोमोटिव्ह ट्रेनिंग सेंटर, यवतमाळ रोड कला वाणिज्य कॉलेज समोर येथे करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेला व्याख्याते म्हणून मा. प्रशांत गावंडे माझी प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यवतमाळ हे सावित्रीबाई ते आपली आई एक प्रेरणादायी प्रवास या विषयावर व्याख्यान करणार आहे.
या व्याख्यानमाला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. अमित भोईटे तहसीलदार राळेगाव हे असणार आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून शितलताई मालटे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन राळेगाव, विनय मुनोत संचालक विनय मेडिकलराळेगाव,आशिष इंगळे संचालक प्रथम एज्युकेशन फाउंडेशन राळेगाव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
