
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव प स अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा शाळेचे हरितसेना प्रभारी विज्ञान शिक्षक व त्यांच्या सुनबाई सौ गायत्री गजानन ढोके यांनी एकत्र गणपती बाप्पा स्थापना केली. त्यात सर्व सजावट हि प्लास्टिक मुक्त असून फक्त कागदांचा व पर्यावरनपुरक रंगांचा वापर केला आहे. विशेष म्हणजे सर्व सृष्टी हिरवीगार वनराई ने शोभावी यासाठी बाप्पाची प्रतिष्ठापना झाडाखाली करण्यात आली. विशेष म्हणजे मूर्ती हिरव्या रंगाची व अस्सल शाडूच्या मातीची तयार करुन घेण्यात आली. यंदा बैल पोळ्यातील बैलांची घटती संख्या विचारात घेता गाई बैल वाचवा हा संदेश देण्यासाठी बाप्पासोबत बैलजोडी ठेवण्यात आली. तंत्रज्ञानाच्या युगात आपण वावरत असलो तरी शेतीसाठी पाळीव प्राणी आवश्यक आहे असे दाखविण्यात आले. सदर सजावटीत सौ गायत्री गजानन ढोके व साक्षी बबन लोडे यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर कल्पनेचे दोन्ही परिवारातील नातेवाईकांकडून व परिसरातील नागरिकांकडून कौतुक केल्या जात आहे.
