
सहसंपादक : रामभाऊ भोयर
् शिक्षण विभागाने जिल्हा विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले असून जिल्हा विज्ञान प्रदर्शनी या वर्षी राळेगाव तालुक्याला मिळाली असून ते ही विज्ञान प्रदर्शनी ग्रामीण भागातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांत घेण्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने ठरविले असून ही जिल्हा विज्ञान प्रदर्शनी घेण्याची संधी तेविस वर्षांनंतर राळेगाव तालुक्याला मिळाली असून ही विज्ञान प्रदर्शनी दिनांक 28/12/2023 ते 29/12/2023 ला होऊ घातली असून या संदर्भात शिक्षणाधिकारी डॉ.जयश्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली उपशिक्षणाधिकारी गोडे साहेबांनी झाडगाव येथे आता पर्यंत तीनदा सभा घेऊन वेगवेगळ्या विभागाच्या समित्या तयार करून अनेक शिक्षक, शिक्षिकांना जबाबदाऱ्या दिल्या असून त्या प्रदर्शनीला अंतिम स्वरूप देण्यासाठी आज दिनांक 22/12/2023 रोज शुक्रवारला शाळेत उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे यांनी या संदर्भात आढावा बैठक घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली.त्यावेळी उपशिक्षणाधिकारी प्रदीप गोडे, प्रशांत पंचभाई सर, निलेश टिकले सर ,वाळके सर,लोडे सर, चिव्हाणे सर,मोहुर्ले सर, भोयर सर, ओंकार सर,थुल सर यांच्या सह तालुक्यातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे विशाल मस्के सरांनी केले तर प्रास्ताविक गाडगे महाराज विद्यालयाचे प्राचार्य राजेश शर्मा सरांनी केले.तर आभार प्राचार्य निमरड सरांनी मानले.
