महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधानाचा ढाणकी शहरात निषेध


प्रतिनिधी, प्रवीण जोशी
ढाणकी


महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा ढाणकी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने दिनांक21 तारखेला निषेध करण्यात आला.
एका जबाबदार व्यक्तीने असे विधान करणे चुकीचे , छत्रपती शिवाजी महाराजांना देशात तर सन्मान आहे शिवाय इतर देश सुद्धा त्यांच्या पराक्रमातील विविध गुण शिकण्याचा प्रयत्न करतात. शिवाय गनिमी कावा कसा असावा हे कौशल्य महाराजांकडून अनेकांनी शिकण्याचा प्रयत्न केला. असे असताना थोर महापुरुषाबद्दल बेताल वक्तव्य करणे चुकीचेच व याच बाबीचा निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करण्यात आला यावेळी शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, अल्पसंख्यांक शेतकरी, व्यापारी संघटना, व अन्य घटक पक्षांनी या बेताल वक्तव्याचा कडाडून विरोध केला.