
झरी,वणी मारेगाव प्रतिनिधी :नितेश ताजणे
वणी तालुक्यातील अहेरअली येथील रेल्वे बोगद्यात सकाळी पावणे अकरा च्या सुमारास धानोरा येथील रामदास तुडमवार वय 50 हे बोरीटाकळी कडे आपल्या मुलीला भेटायला आपल्या दुचाकीने जात होते ,त्यांचा कापसाचा व्यवसाय होता ,या रेल्वे बोगड्यात समोरून येणाऱ्या दुचाकीला वणी आगाराची टाकळी ते वणी शाळकरी विध्यार्थी वाहू बस क्रमांक एम एच 40 AR -6062 या बस ने दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने रामदास तुडुमवार यांचा जागीच मृत्यू झाला , या रेल्वे बोगद्यात नेहमी पाणी साचून असते व अपघात प्रवण स्थळ आहे ,या बोगद्या विषयी अनेकांनी आक्षेप व तक्रारी ही केल्या आहेत ,बस चालकाला पाटण पोलिसांनी ताब्यात घेतले असून ,प्रेत उत्तरीय तपासणी साठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे ,यावेळी मोठा जनसमुदाय या रुग्णालयात उलटला होता ,त्यांच्या मागे पत्नी दोन मुली व एक मुलगा आहे
