
तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
कळंब प्रभाग क्र. 10 व 11 चे संयुक्त विद्यमाने शिवप्रेमी मित्र परिवार तर्फे दरसाल प्रमाणे याही वर्षी कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज याची 393 वी जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रम व्दारे साजरी करण्यात आली.
यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. अरविंदभाऊ कुडमथे सर, (बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) , मा. आकाश भाऊ कुठेमाटे उपनगराध्यक्ष न. पं कळंब., सोनु भाऊ सिद्दीकी, समाजसेवक, अभिभाऊ पांडे, (शिवसेना कळंब तालुका अध्यक्ष) , पंकजभाऊ बान्ते( सामाजिक कार्यकर्ते) , प्रा. सुरज भाऊ मस्के सर,( बिरसा ब्रिगेड राळेगांव तालुकासंघटक) , स लंलललृऋ भाऊ व्ऋवलहारे, जिल्हा संपर्क प्रमुख बिरसा ब्रिगेड, प्रमोद भाऊ ईरपाते कळंब तालुका अध्यक्ष बिरसा ब्रिगेड, उमेशभाऊ यरमे संपर्क प्रमुख जिल्हा बिरसा ब्रिगेड यवतमाळ. राहुल भाऊ मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते,विजय भाऊ चव्हाण (नगरसेवक ) लक्ष्मण भाऊ ढाले शारदा ताई थोठे, (सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला जिल्हा शीवसेना उपाध्यक्ष ), सुनिता ताई,डेगमवार ( माजी नगराध्यक्ष नगर पंचायत कळंब) कीर्ती ताई बान्ते, (सामाजिक कार्यकर्त्या) प्रज्ञाताई भवरे (सामाजिक कार्यकर्त्या) अल्काताई कराळे, अरूणाताई कांबळे (सामाजिक कार्यकर्त्या) ईत्यादी प्रमुख पाहुणे हजर होते.
प्रमुख वक्ते उध्दवजी शेरे पाटील (बोरखेडी सिंदखेड राजा ) यांनी प्रबोधन करतांना सांगितले की, प्रत्येक मांतानी आपले मुलांना शिवबा घडवा .तर अध्यक्षीय भाषणात डॉ अरविंद कुडमथे यांनी विज्ञाननिष्ठ समाज घडविण्याचे आव्हान केले.सर्व प्रथम पाहुण्यांनी कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुजा करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे यशस्वी साठी शिव प्रेमी मित्र परिवारातील सदस्य, शिवा भाऊ गावंडे, अमरभाऊ हजारे, रवी भाऊ बावणे, विठ्ठल नेहारे, सचिन भाऊ माहुरे, राम सहारे, लक्ष्मण सहारे, गोपाल भाऊ गावंडे, व रवि भाऊ भोंडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश भवरे यांनी केले, प्रास्ताविक शुभम भाऊ तांडेकर यांनी केले. आभार शीवाभाऊ गावंडे यांनी केले.
