मोदी को आया होश..राळेगावात काँग्रेसचा जल्लोष!,पोशिंद्या समोर अखेर केंद्र सरकार नमल्याची भावना प्रतिबिंबित

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

मागील अकरा महिन्यापासून केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात अविरतपणे आंदोलनाची धग कायम असतांना अखेर हे कायदे रद्द करण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढवली.हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असून रद्द ची घोषणा होताच राळेगावात काँग्रेसच्या वतीने फटाके फोडीत जल्लोष केला.कृषी प्रधान देशाच्या पोशिंद्याच्या शेतीव्यवस्था भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी मोदी सरकारने तीन कृषी कायदे आणले होते.संयम आणि शांततेने या कायद्याच्या विरोधात मागील अकरा महिन्यापासून शेतकरी आंदोलनाची धग कायम असतांना सरकारच्या पायाखालील वाळू सरकत होती आणि हे कायदे रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. या शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाने राळेगावात जल्लोष करण्यात आला.दरम्यान आंदोलनात बळी गेलेल्या व चिरडून टाकलेल्या प्रत्येक घटनेचा हिशेब चुकता करण्यासाठी आगामी काळात जनतेंनी सावध होत संधी दवडू नका.परिवर्तनाची कास धरून एकजुटीची ताकद दाखविण्याची वेळ आली असूनसत्तेचा पलटवार यानिमित्ताने कृतीत उतरवा असे आवाहन यावेळी काँग्रेस कडून करण्यात आले.

या जल्लोष प्रसंगी यवतमाळ जिल्हा काँग्रेस सरचिटणीस जानरावभाऊ गिरी, राळेगाव तालुका शहराध्यक्ष प्रदीपभाऊ ठुणे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंदभाऊ तामगाडगे, खरेदी विक्री संघ सदस्य अशोकरावजी काचोळे, प्रहार चे अध्यक्ष संजयभाऊ दुरबुडे, साप्ताहिक आत्मबल चे संपादक मंगेशभाऊ राऊत, दिलीप भाऊ कन्नाके, राजूभाऊ पुडके, बादशहाभाई, व अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.