
पक्षप्रमुख श्री. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना नेते मा. श्री. सुभाषजी देसाई साहेब, पक्ष सचिव खासदार मा. श्री.अनिलजी देसाई साहेब, संपर्क नेते खासदार मा. श्री. अरविंदजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विदर्भ समन्वयक मा. अरविंदजी नेरकर साहेब यांच्या सुचनेवरुन सोमवार दि. ०७/०८/२०२३ रोजी विश्रामगृह यवतमाळ येथे पदाधिकारी आढावा अभियान अंतर्गत राळेगाव शहरातील शिवसेनेचे शहर संघटक इम्रान भाई पठाण यांचा शिवसेनेचे वर्चस्व वाढवणे तसेच कामाची पद्धत चांगल्या प्रकारची असुन शिवसैनिक जोडण्याचे उत्कृष्ट कौशल्याची कला आहे असे उदगार काढून मा.संदिप दादा देशमुख साहेब यांनी शिवसेनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राळेगाव विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख मा. संदिप दादा देशमुख साहेब व दिगंबर भाऊ मस्के उप जिल्हाप्रमुख (कळंब) यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभ वेळी प्रमुख उपस्थितीत राळेगाव विधानसभा संपर्कप्रमुख संदिप दादा देशमुख साहेब, अमोल भाऊ धोबेकर(युवा सेनेचे तालुका प्रमुख), गजानन भाऊ पांडे (तालुका प्रमुख बाभुळगाव), राजु भाऊ मांडवकर(राळेगाव विधानसभा संघटक) महादेव पोंगडे, चेतन शिंदे, धनराज चामलाटे सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. जात,धर्म, पंथ नपाहता एका सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याच काम फक्त शिवसेनेतच होत असते हे येथे उल्लेखनीय. शिवसैनिकाचा सत्कार केल्याबद्दल शिवसेनेविषयी वेगळी आपुलकी निर्माण झाली आहे अशी जनमानसात खमंग चर्चा सुरु आहे.
