
प्रतिनिधी :- संजय जाधव
ऊमरखेड तालुक्यातील कुरळी -घमापुर येथील तिन युवकांनी आपल्या जिद्द व मेहनतीने पोलिस भरतीत यश संपादन करित पोलिस विभागात रुजू झाल्याने गावकर्यात आनंद व्यक्त होत आहे .
चेतन शाम राठोड, सुरज अर्जुन राठोड व रामेश्वर गजानन बर्गे असे त्या पोलिस झालेल्या युवकांची नावे असून बंदी भागातील कुरळी या छोट्याशा गावामध्ये आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून..आई-वडिलांच्या काबाड कष्टांची जाण ठेवून रामेश्वर बर्गे याने पोलिसात स्थान मिळविले तर आपल्या वडिलांप्रमाणेच आपलाही अंगावर आयुष्यभर खाकी असावी..या ध्येयाने प्रेरित होऊन अहोरात्र अभ्यास करून सुरज याने स्वप्न पूर्ण केले .
तसेच कुठल्याही परिस्थितीत पोलिस व्हायचे व आईबाबाची सेवा करायची म्हणून चेतन राठोड ( घमापूर )यानेही यश मिळविले . यांनी जवळच्याच किनवट येथील जाधव अँकेडमी मधून प्रशिक्षण घेवून पोलिस भरतीत यशस्वी झाले आहे .
तिन्ही युवातरुणांच्या यशाने कुरळी गावात झेंडा रोवला आहे .निश्चितच हे यश आमच्या कुरळीवाशियांसाठी अभिमानाची व भूषणाची बाब असल्याच्या प्रतिकिया गावकर्यांनी व्यक्त केल्या आहेत.
महिनाभरा अगोदर लातूर या ठिकाणी दोघांनी तर एकाने जालना येथे पोलीस ट्रेनिंग पूर्ण करून रुजू झाल्याने गावकर्यांत आनंद व्यक्त होत आहे .
बंदीभागातील अनेक बेरोजगार युवक व पोलिस भरतीत नसीब आजमावणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी दराटी पोलिस ठाण्यातून निवृत्त झालेले एएसआय दिपक कांबळे हे वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन करून गरिब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देवुन पोलिस भरतीसाठी आग्रही राहतात. त्यांनी या कुरळी – घमापुरच्या पोलिस भरतीत उत्तीर्ण होवून रुजू झालेल्या युवकांचा सत्कार केला आहे .
