
लोकहीत महाराष्ट्र वरोरा ग्रुप ला जॉईन करा आणि मिळवा प्रत्येक बातमी
https://chat.whatsapp.com/L7EMtZ0F9qYA9NJ6uI1clY
आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा परिजनांनी घेतला होता
अबीद शेख हत्याकांडातील आरोपी देवा नौकरकार याला अटक झाल्याशिवाय शवविच्छेदन होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा मृतक अबीद शेख यांच्या परिजनांनी घेतल्यानंतर चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी आश्वासन देत शवविच्छेदन झाल्याशिवाय कोणताही अहवाल मिळने अशक्य असून आरोपी वर कारवाई होईल त्यासाठी शवविच्छेदन होऊ द्या अशी विनंती केली असता खासदार धानोरकर यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी स्वतः एस. पी. चंद्रपूर यांची भेट घेऊन मोक्का अंतर्गत कारवाई साठी विनंती करणार असल्याचे सांगितले .
त्यानंतर अखेर अबीद शेख यांच्या परिजनांनी शवविच्छेदन करण्यासाठी मान्यता दिली.शवविच्छेदन करून शव परिजनाच्या स्वाधीन करण्यात आला .व दफनविधी करण्यात आला.
आरोपींना अटक करण्यासाठी वेगवेगळ्या आठ चमुला पाठविण्यात आले होते.त्यामुळे 24 तासाच्या आत आरोपी देव नौकरकार याना गडचिरोली येथून अटक करण्यात आली .घटनेतील सर्व आरोपीना कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती मृतकाच्या परिजनांनी प्रशासनास केली आहे.
