
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
कोंघारा येथील कृषी महाविद्यालयातील सातव्या सत्रामध्ये शिकत असणाऱ्या कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना सरकारी योजने बद्दल मार्गदर्शन केले.सर्व शेतकऱ्यांना सरकारी योजना काय आहे, त्याचा फायदा, त्याचे महत्त्व, त्याचे लाभ सर्व घटकांची माहिती कृषी कन्या वैष्णवी काळे, रासेश्वरी जुमडे, शरवरी दसोडे, श्रृष्टी गायमुखे, वैष्णवी कोटकर यांनी दिली व प्रा. सागर सुराडकर सर यांचे मार्गदर्शन मिळाले.
सरकारी योजना प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, किसान क्रेडित कार्ड, पशु किसान क्रेडिट कार्ड, इत्यादि योजनांचा समावेश होता. मार्गदर्शन करताना गावातील समस्त गावकरी उपस्थित होते.
