
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महसूल मंडळ किन्ही जवादे येथे दिनांक 8/5/2026 रोजी महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी विकास मिना यांचे आदेशानुसार व सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव यांचे मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व स्वाभिमान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री अमित भोईटे तहसीलदार राळेगाव यांचे हस्ते झाले. सदर कार्यक्रमास नायब तहसीलदार किरण किनाके, मंडळाधिकारी दिलीप चिडे, गाईड चव्हाण, अनिल कणसे तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व मंडळातील मान्यवर पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये विविध विभागाकडून लाभार्थ्यांना 1412 लाभ वाटप करण्यात आले. विद्यार्थी शेतकरी , महीला यांना 2460 दाखले व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. विविध विषयावर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किन्ही जवादे मंडळाधिकारी श्री. एम.डी. सानप यांनी केले. कार्यक्रमात सरपंच किन्ही जवादे सुधीरभाऊ जवादे, धुम्मक चाचोरा येथील प्रगतिशील शेतकरी वैकुंठ मांडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी विद्यूत विभागाचे अभियंता लोहे तसेच किन्ही ज येथील प्रतिष्ठित नागरिक संजय काकडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तालुक्यातील मनोज भोयर, महेश आवारी, सचिन टोंग,अर्चना गोवारदिपे, रामूजी भोयर, बंडू वेले, गोपाल भोयर, मुख्याध्यापक टापरे सह सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी , पोलीस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका ग्रामसेवक, आशा वर्कर, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात रिधोरा येथील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पत्रकार दिपक पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी प्रांजू खोंडे, सौरभ चांदेकर, राहूल निशाणे, निलोबा मातकर, नसिम शेख, ग्राम पंचायत अधिकारी राजू निवल, पोलीस पाटील अनुराग जवादे, विनोद मोरे, कपील खडसे, महसूल सेवक रविंद्र ठाकरे , रूपेश पेचे व वंदना धनरे यांनी अथक परिश्रम घेतले. कर्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने करण्यात आली.
