
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तहसील कार्यालयात व परिसरात काही भामटे दलाल गाव खेड्यातून तहसील कार्यालयात येणाऱ्या गोरगरीब अशिक्षित नागरिकांना हेरून व तहसीलचे कामे करून देतो असे बतावणी करून त्या गोरगरीब अशिक्षित नागरिकांना आर्थिक लूटमार करण्याचे प्रकार तहसील कार्यालयात व परिसरात बऱ्याच दिवसापासून घडत आहे या घटनांना आळा बसविण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने दिं.११ऑगस्ट २०२५ रोज सोमवारला तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी उपजिल्हा प्रमुख विनोद काकडे ता. प्रमुख विजय पाटील शंकर गायधने उप ता प्र प्रशांत वार्हेकर शहर महिला आघाडीच्या प्रमुख पार्वताबाई मुखरे योगेश मलोंडे अंकुश गेडाम सुनील क्षीरसागर श्रीकांत कोदाने मडावी येवती धनराजजी श्रीरामे सुनील सावरकर महेंद्र तुमाने रोशन इरपाते हिमांशू कोहळे शंतनु श्रीराम सहारे इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी प्रतिभा सुनील करलुके वय २२ राहणार झाडगाव ही महिला आपल्या लहानग्या बाळासोबत शिधापत्रिका नूतनीकरण व अधिवास प्रमाणपत्र बनविण्यासाठी तहसील कार्यालयात आली होती शिधापत्रिकेचे नूतनीकरण व अधिवास प्रमाणपत्र काढून देतो म्हणून एका भामट्याने ३०० रुपये घेतले व कार्यालयातून पसार झाला त्या गरीब कमी शिकलेल्या महिलेने दिवसभर त्या भामट्याची वाट पाहिली परंतु तो आला नाही या घटनेची रीतसर तक्रार महिलेने तहसील कार्यालयाला दिली आहे हदबल महिलेला शिवसेनेने आधार देत शिवसेनेच्या दबावात पुरवठा विभागाने तिचे शिधापत्रिकेचे काम मार्गी लावले अशा भामट्या व लुटमारी करणाऱ्या दलालांवर ताबडतोब कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले निवेदन देतेवेळी उपजिल्हाप्रमुख विनोद काकडे, तालुकाप्रमुख विजय पाटील, शंकर गायधने उपतालुकाप्रमुख प्रशांत वाऱ्हेकर ,शहर महिला आघाडीच्या प्रमुख पार्वताबाई मुखरे ,योगेश मलोंडे ,अंकुश गेडाम, सुनील शिरसागर, श्रीकांत कोदाने,धनराज श्रीरामे, सुनील सावरकर, महेंद्र तुमाने, रोशन इरपाते हिमांशू कोहळे शंतनु सहारे आदी शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तसेच निवेदनावर संतोष रामभाऊ मेश्राम लोभेश राऊत राजू किन्हेकार सुरेश चाफेकर हिमांशू कोहळे रवींद्र मेश्राम निलेश जुनगरे वैभव दुधे वसंत कोदाने संतोष होले संदीप ढगले शंकर ऊईके मनोज शिंदे नामदेव शेलवटे दीपक केवटे झाडगाव. कवडूजी भोयर शेळी. महादेव लाभाडे राहुल शिंदे धनराज चामलाटे इत्यादींच्या स्वाक्षरी सह निवेदन देण्यात आले.
