राजाबाई शाळेत महादीप परीक्षा, २१ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक राजाबाई कन्याशाळेत तालुकास्तरीय महादीप परीक्षेची अंतिम फेरी पार पडली. प्रथम फेरीमध्ये पात्र वर्ग पाच ते आठच्या ८२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. एकूण २१ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय परीक्षा फेरीसाठी निवड झाली. विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, स्पर्धा परीक्षेचे बाळकडू शालेय जीवनातच मिळावे, यासाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर या परीक्षेचे आयोजन केले होते. कार्यक्रम समन्वयक राहुल कुंभारे, प्रशांत चांदोरे, पर्यवेक्षक म्हणून प्रशांत महल्ले, प्रवीण देवकते, मनोहर मेश्राम, सचिन वेरुळकर, सुरेखा अड्डे, माधुरी धामंदे, राहुल पोटरकर, दीपेश शेंडे, विनोद मेंढे यांचे सहकार्य लाभले.