

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
हिमायतनगर तालुक्यातील करंजी फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व आय चर चा समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना सायंकाळी साडे सातच्या दरम्यान घडली यामध्ये ट्रक व टेम्पो चालकांचा मृत्यू झाल्याचे घटनास्थळी दिसून आले .
याबाबत सविस्तर वृत्त असे की झारखंड राज्यात महावितरण चे काम करणारे कामगार त्यांच्या टेम्पो मधून विद्युत लाईनचे साहित्य घेऊन जात असताना हिमायतनगर तालुक्यातील करंजी फाटा येथे त्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला त्यात ट्रक चालका सह 5 जन जागीच मृत्युमुखी पडल्याचे हिमायतनगर येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी.डी भुसनूर व सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांनी सांगितले व इतर चार जण गंभीर जखमी असल्याने त्यांना तात्काळ ॲम्बुलन्स बोलून पुढील उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी घटना स्थळी ट्रक नो. MH 26 BE 1011 चा आयचर चा चुराडा झाल्याचे यातील जखमींना युवा सेना तालुका प्रमुख योगेश पवार व श्री दत्त पाटील सोनारी कर,परमेश्वर सूर्यवंशी,ज्ञानेश्वर पुठ्ठे वार,शेख खयुम यांनी कार्य तत्परता दाखून रस्ता मोकळा करून देण्यासाठी त्यांनी पोलिसांना सहकार्य केल्याचे यावेळी पहायला मिळाले,
