
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित झाली नसल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवार कोण असेल हा संभ्रम निर्माण झाला होता.महाविकास आघाडीच्या वरीष्ठाच्या अंतिम चर्चेदरम्यान राळेगाव विधानसभा उमेदवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ आणि सक्रिय जेष्ठ नेते प्राध्यापक वसंतराव पुरके सरांना घोषित झाल्यामुळे राळेगाव तालुक्यातील व राळेगाव विधानसभेच्या कार्यकर्त्यांतील शेतकरी शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांच्या मनात आनंदाचे वातावरण पसरले असून दिनांक 28/10/2024 रोज सोमवारला प्राध्यापक वसंतराव पुरके सर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून महाविकास आघाडीच्या सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यांनी ठीक दहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले असून उमेदवारी दाखल करतेवेळी विधानसभा मतदारसंघातील सहा ते सात हजार कार्यकर्ते पुरुष, महिला व शेतकरी शेतमजूर उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
