बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी येथील पोलीस चौकी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न


ढाणकी ( प्रती)प्रवीण जोशी


दिनांक १४ जानेवारी शनिवार रोजी बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे ढाणकी येथील पोलीस चौकीला शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी या कार्यक्रमाला पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी शहरातील अनेक प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. संजय कुंभरवार नागेश महाजन रमण रावते, अनिल येरावार शहराचे नगर उपाध्यक्ष जहीर भाई, बाळासाहेब चंद्रे, रामराव गायकवाड , रमण रावते इत्यादी मान्यवर उपस्थित होते या सर्वच उपस्थित मान्यवरांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की कायद्याच्या चाकोरीत राहून अत्यंत आनंदाने व उत्साहाने सर्वच सण साजरे करावे परंतु आपल्याकडून हे उत्सव साजरे करताना कोणतेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी विशेष करून युवक हे देशाची संपती असून त्यांनी व्यसनाच्या आहारी न जाता व्यवसाय करून आर्थिक प्रगती साधावी यातच प्रगती आहे.असे सर्वच मान्यवरांनी सुचविले व यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस म्हणाले
आलेल्या सर्व मान्यवरांच्या भावनांचा आधार करतो आपणही प्रशासनास मदत करावी असे आव्हान केले.तर सध्या सायबर चे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असून याबाबत सर्वांनी सतर्क असायला पाहिजे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे यावेळी आवर्जून सांगितले.