
वरोरा:- शहरातील रहिवासी धनराज नानाजी गोचे वय ४७ वर्ष यांनी आज दिनांक 2 जानेवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला.
धनराज नानाजी गोचे हा वरोरा येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या जी एम आर मॅको या कंपनीत 13 वर्षापासून कार्यरत होता सदर मजूर हा दोन तीन महिन्यापासून आजारी असल्याने तो कामावर जाऊ शकला नाही. कामावर रुजू होण्यासाठी गेला असता कंपनी अधिकारी धनराज यास मानसिकरित्या त्रास देत होते वारंवार विविध प्रकारच्या मेडिकल साठी मागणी करत असल्याने अखेर कंपनीच्या त्रासाला कंटाळून आज विष प्राशन केले याची माहिती गावातील सरपंच नंदलाल टेंमुर्डे जग्गू गोचे यांना कळतात यांनी त्या मजुरास चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्या असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अति दक्षता विभागात ठेवण्यात आलेले आहे.
