अतिवृष्टीमुळे पीक गेले; गोटमार बोरी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

मारेगाव : तालुक्यातील जुलै महिन्यात हाती आलेल्या हंगामात कपासी पीक हिरावल्यामुळे वैफल्यग्रस्त एका शेतकऱ्याने आत्महत्या केली महादेव भाऊराव भेंडे असे शेतक-याचे नाव आहे. राहत्या घरी आज दि. ७ ऑगस्ट सोमवार रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास विषप्राशन करून आत्महत्या केली. घरचा कर्ताच गेल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
शेतकरी महादेव भेंडे यांच्याकडे अंदाजे ७ एकर जमीन आहे. त्यांनी शेतीकरिता कर्ज उचल करून शेतात कपाशी पिकांची पेरणी केली शेतात लागवड केलेल्या पिकांतून मिळणा-या उत्पन्नातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र, जुलै महिन्यात कधी नव्हे पाऊसामुळे शेतामध्ये पाणी शिरले. यामुळे सदर शेतकऱ्याचे कापूस पीक पुराच्या पाण्याखाली आल्याने उद्धवस्त झाले. त्यापूर्वीही त्याला मागील वर्षी याच संकटाला समोर जावे लागले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने बँकेचे कर्ज आणि इतरांकडून हात उसने घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत महादेव होते. महादेव यांनी आज पहाटे आपल्या राहत्या घरी विषप्राशन करून आत्महत्या केली. ही घटना घरच्या लक्षात आल्याने मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.. महादेव यांच्या पश्चात आई-पत्नी एक मुलगा एक मुलगी असून महादेव च्या जाण्याने भेंडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.